जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना–मनसे युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. या राजकीय घडामोडीचे स्वागत करत जळगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गुरुवारी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला.
युती जाहीर होताच जळगाव शहरात ढोल–ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत व फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. ठाकरे बंधू एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक वळण लागले असून, मराठी माणसाच्या हितासाठी ही युती महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.
या जल्लोषप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष किरण तळेले, विनोद शिंदे, उपशहराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, चेतन पवार, ललित शर्मा, प्रकाश जोशी, राजेंद्र निकम, विभाग अध्यक्ष उमेश अठरे. विभाग अध्यक्ष विशाल जाधव. दीपक राठोड, राहुल चव्हाण, आशुतोष जाधव, पंकज राजपूत, पियुष गुजर, सचिव जितेंद्र पाटील, राहुल ठाकूर, प्रसिद्धी प्रमुख सतीश सैंदाणे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष रजाक भाई सय्यद, समीर लालाभाई, अन्नू भिस्ते, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, संदीप मांडोळे, शाखा अध्यक्ष अनिता कापुरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी ठाकरे बंधूंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, येणाऱ्या महापालिका व आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना–मनसे युती राज्यात निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा