Top News

भूखंड लाटणारा नेता म्हणजे गिरीश महाजन – माजी खासदार उन्मेष पाटील

निर्धार मेळाव्यात उन्मेष पाटील यांचा भाजप नेत्यांवर हल्लाबोल; पार्थ पवारांच्या वक्तव्यालाही दिला जोरदार पाठिंबा

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I "वरखेडे-लोंढे बॅरेज प्रकल्प मी आमदार असताना साडे पाचशे कोटी रुपये आणून पूर्ण केला. आणि तुम्ही पाचशे लोकवस्ती असलेल्या तामसवाडी गावाचे पुनर्वसन करू शकत नाही," असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी उपस्थित केला. या वक्तव्यावर भाष्य करताना उन्मेष पाटील यांनी भाजप नेत्यांवर थेट हल्ला चढवला.

ते म्हणाले, “हे तर पार्थ पवारांनी केलेले वक्तव्य म्हणजे नमुना आहे. पण जर कुणी भूखंड लाटणारा नेता किंवा विद्यापीठ लाटणारा असेल, तर तो दुसरा कोणी नसून गिरीश महाजन आहे,” असा गंभीर आरोप उन्मेष पाटील यांनी केला.

चाळीसगावात आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उन्मेष पाटील यांच्या वक्तव्याला प्रतिसाद दिला. त्यांनी पुढे सांगितले की, "विकासाच्या नावाखाली फक्त स्वतःचा स्वार्थ पाहणाऱ्या नेत्यांनी जनतेचा विश्वास गमावला आहे. लोक आता जागृत झाले आहेत आणि आगामी निवडणुकांमध्ये जनतेचा कौल खरा विकास करणाऱ्यांनाच मिळेल."

या मेळाव्यात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात प्रदेश, जिल्हा आणि तालुका स्तरावरील अनेक नेत्यांनीही आपली मते व्यक्त केली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने