जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
जळगाव जिल्हा पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी मंगळवारी (दि. ५ नोव्हेंबर) सायंकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी “नाकाबंदी” आणि “ऑल आऊट ऑपरेशन” राबवले. या धडक मोहिमेत जिल्हाभरातील एकूण २६९ पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी विविध ठिकाणी २,४५८ वाहने तपासली, तसेच ८२ तडीपार आरोपींची पडताळणी करण्यात आली. गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी व समाजविघातक घटकांवर लक्ष ठेवण्यासाठी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी विविध कायद्यांन्वये पुढीलप्रमाणे कारवाया केल्या –
📊 ऑपरेशनमधील प्रमुख कारवाया:
🥃 प्रोव्हीजन कायद्यान्वये गुन्हे: ९०
🎰 जुगार कायद्यान्वये गुन्हे: ३४
🏨 हॉटेल्स / लॉजेस तपासणी: १३५
🗡️ शस्त्र कायद्यान्वये गुन्हा: १
💊 अंमली पदार्थ (NDPS) गुन्हे: २२
⚖️ महा.पो.का.क. १२२ प्रमाणे कारवाया: १४
🧾 वॉरंट (NBW) बजावले: १४८
🚦 मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई:
📄 एकूण केसेस: ६७१
💰 एकूण दंड वसूल: ₹५,१०,३५०/-
या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकांमध्ये दहशत निर्माण झाली असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. जिल्हा पोलीस दलाने अशा मोहिमा यापुढेही नियमितपणे राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
👉 जळगाव पोलिसांचे ‘ऑल आऊट’ ऑपरेशन : कायदा व सुव्यवस्थेसाठी धडक कारवाई!
टिप्पणी पोस्ट करा