Top News

नागरिकांचा पहिला पर्याय ठरलेले नगरसेवक जितेंद्र भगवानराव मराठे

प्रभागातील विकासकामे, दांडगा लोकसंपर्क व पारदर्शक कार्यशैलीमुळे जळगावकरांमध्ये वाढते लोकप्रियता, जनतेसाठी अहोरात्र कार्यरत – नगरसेवक जितेंद्र मराठे बनले नागरिकांचा विश्वासाचा आधार, नागरिकांशी थेट संपर्क, समस्या ऐकून तात्काळ कार्यवाही

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील नेहरू नगर, चैत्रबन कॉलनी, छत्रपती संभाजीनगर, दौलत नगर , रायसोनी नगर या विस्तीर्ण प्रभागाचे नेतृत्व करणारे भाजपाचे नगरसेवक जितेंद्र भगवानराव मराठे हे आज नागरिकांच्या मनात पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या कार्यशैलीत विकास व लोकसंपर्काचा सुंदर संगम दिसतो. सामान्य घरातून आलेले जितेंद्र मराठे यांनी प्रामाणिकपणा व कामकाजातील पारदर्शकतेच्या जोरावर प्रभागात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
🔹 सर्वांपर्यंत पोहोचणारा लोकसंपर्क

नेहरू नगर परिसरात राहणारे जितेंद्र मराठे हे दररोज आपल्या प्रभागातील वेगवेगळ्या भागात जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकतात. प्रत्येक व्यक्तीशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतात.
त्यांच्या या "दारी-दारी लोकसंपर्क" उपक्रमामुळे नागरिकांचा विश्वास वाढला असून, प्रभागातील बहुतांश समस्या त्यांच्या लक्षात तत्काळ आणल्या जातात व त्यावर त्वरित कार्यवाही केली जाते.

🔹 प्रभागातील विकासकामांचा वेग वाढला

नगरसेवक मराठे यांच्या कार्यकाळात प्रभागात अनेक मूलभूत सुविधा विकसित झाल्या आहेत.

रस्ते व मुख्य मार्गांचे दुरुस्ती व काँक्रीटीकरण काम पूर्ण झाले आहे.

गटारी व ड्रेनेज व्यवस्था नव्याने उभारण्यात आली असून, अनेक भागांत पावसाळ्यातील पाणी साचण्याचा त्रास संपला आहे.

पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाईन दुरुस्ती व नवीन जोडण्याचे काम सुरू आहे.

परिसरातील मुख्य रस्त्यांवर एलईडी लाईट बसविण्यात आले असून रात्री सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे.

स्वखर्चाने केली संपूर्ण परिसरात धुरळणी 
अलीकडेच जितेंद्र मराठे यांनी स्वखर्चाने संपूर्ण प्रभागात मोठ्या प्रमाणावर धुरळणी (फॉगिंग) मोहीम राबवली. डेंग्यू, मलेरिया व इतर आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून त्यांनी स्वतः पुढाकार घेत हा उपक्रम केला.
या मोहीमेमुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, “आरोग्याच्या समस्या होऊ नयेत” यासाठी मराठे यांनी केलेले हे काम मोठ्या प्रमाणावर कौतुकास्पद ठरले आहे.

🔹 नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न

अजून काही ठिकाणी रस्ते, गटारींचे काम सुरू आहे. या कामांबाबत नगरसेवक मराठे स्वतः लक्ष ठेवून आहेत.
ते म्हणतात, “जे काम अपूर्ण आहे, ते लवकर पूर्ण करून प्रभागातील प्रत्येक नागरिकाला सोयीच्या सुविधा देणे हेच माझं ध्येय आहे.”

मराठे यांचे सहकार्य व त्यांचा मित्रपरिवार 
जितेंद्र मराठे यांच्या प्रभागातील कार्यात त्यांचे मित्रपरिवार, स्थानिक कार्यकर्ते, नागरिक सतत सहकार्य करतात. सर्वांनी मिळून परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
त्यांच्या टीमच्या एकतेमुळे अनेक सामाजिक उपक्रम — जसे की स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, गणेशोत्स व नवरात्रीत सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम — यशस्वी ठरले आहेत.

🔹 नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास

प्रभागातील नागरिकांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे.

> “मराठे साहेबांकडे गेलं की आपली अडचण ऐकली जाते व लगेच काहीतरी उपाय होतो,” असं रहिवासी सांगतात.
“पूर्वी आमच्या भागात पाणी व रस्त्यांची समस्या होती, आता खूप सुधारणा झाली आहे,” असंही नागरिकांचे मत आहे.

विकासकामे, लोकसंपर्क, पारदर्शक कार्यशैली व सर्वसामान्यांशी आपुलकी या सर्व बाबींमुळे नगरसेवक जितेंद्र भगवानराव मराठे हे आज जळगावकरांच्या मनातील पहिला पर्याय ठरले आहेत. त्यांच्या प्रभागातील कामे पाहता “एक जबाबदार व कार्यक्षम लोकप्रतिनिधी कसा असावा” याचं उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिलं आहे.

> “पूर्वी आमच्या भागात रस्ते व गटारींची खूप अडचण होती. पण मराठे साहेबांनी सातत्याने लक्ष देऊन ती कामं पूर्ण केली. आता पावसात पाणी साचत नाही, हेच मोठं समाधान आहे.”
— विलास पाटील, रहिवासी, नेहरू नगर

> “जितेंद्र मराठे हे प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक सणात परिसरात दिसतात. आमच्या छोट्या-छोट्या समस्यांनाही ते महत्त्व देतात. त्यामुळे लोक त्यांना ‘आपले नगरसेवक’ म्हणतात.”
— मुकेश चौधरी रहिवासी, चैत्रबन कॉलनी

> “ते रात्री उशिराही फोन घेतात व किंवा त्यांच्यासोबत राहणारे मित्र परिवार लगेच कामाला लागतात. असा तत्पर नगरसेवक क्वचितच दिसतो.”
— रमेश वाणी, रहिवासी, छत्रपती संभाजी नगर

> “गेल्या काही वर्षांत आमच्या प्रभागात खूप बदल झाला आहे. रस्ते, लाईट, पाणी, स्वच्छता – सर्वत्र सुधारणा झाल्याने आमच्या सोयी वाढल्या आहेत.”
— सोनवणे काका रहिवासी, रायसोनी नगर

> “मराठे साहेब लोकांमध्ये मिसळून काम करतात. त्यांना अहंकार नाही, हीच त्यांची खरी ताकद आहे.”
विनोद कदम, दौलत नगर परिसरातील नागरिक

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने