जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील शनिपेठ परिसरातील कांचननगर भागात रविवारी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून झालेल्या गोळीबारात तिघे युवक गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जखमींवर जिल्हा शासकीय रूग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार, कांचननगर भागात दोन युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. हा वाद चिघळत जाऊन त्याचे रूपांतर थरारक गोळीबारात झाले. या घटनेत आकाश टपऱ्या, गणेश सोनवणे आणि तुषार उर्फ साबू हे तिघे जखमी झाले आहेत. घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशीत गोळीबार करणाऱ्यांमध्ये दोन संशयितांची नावे समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
घटनेमागील नेमके कारण, वापरलेले शस्त्र आणि आरोपींची अटक झाली आहे की नाही याबाबतचा तपास शनिपेठ पोलिसांकडून सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा