जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
जळगाव शहरापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या उमाळा येथील श्री लोहन माता मंदिरात लाठी कुलस्वामिनी परिवाराची वार्षिक बैठक, सत्संग आणि अन्नकूट महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. देशभरातील विविध भागांत वास्तव्यास असलेले लाठी परिवाराचे सदस्य या कार्यक्रमासाठी हजेरी लावून आपल्या कुलदेवीचे दर्शन घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात पहाटे सात वाजता श्री माताजींच्या अभिषेकाने झाली. त्यानंतर सकाळी नऊ वाजता भजन, सत्संग आणि सत्यनारायण भगवान पूजन पार पडले. या धार्मिक वातावरणानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले. सभेमध्ये मागील वर्षाचा ताळेबंद अहवाल सादर करण्यात आला व सर्वानुमते मंजूरही करण्यात आला.
या वेळी शैक्षणिक क्षेत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी आरती आणि अन्नकूट महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या वेळी लाठी कुलस्वामिनी परिवाराचे अध्यक्ष अॅड. नारायण लाठी, पदाधिकारी ईश्वर लाठी, विजय लाठी, बी.जे. लाठी सर, पवन लाठी, दीपक लाठी तसेच कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम अत्यंत भक्तिभावात आणि पारंपरिक उत्साहात पार पडला.
टिप्पणी पोस्ट करा