Top News

शिक्षकांचे रखडलेले वेतन अदा करण्यासाठी कास्ट्राईब महासंघाचे निवेदन


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I एप्रिल महिन्याच्या १० तारखेपर्यंत निधी उपलब्ध असूनही माध्यमिक शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन अद्याप न मिळाल्याने, माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती व कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांना निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनाद्वारे येत्या १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागांचे वेतन अदा करण्यात यावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली. या प्रसंगी कास्ट्राईब महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष अरुण गाडे यांच्या नेतृत्वात जिल्हा समन्वयक तुळशीराम सोनवणे, मार्गदर्शक डॉ. मिलिंद बागुल आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षक आमदार किशोर दराडे व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडेही संघटनेमार्फत मागणी करण्यात आली असून, सर्व संबंधित मान्यवरांनी या प्रकरणात सकारात्मक भूमिका घेतली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर, वेतन पथक अधीक्षक रियाज तडवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी महावीर जयंतीच्या सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात उपस्थित राहून तात्काळ वेतन प्रक्रियेची जबाबदारी पार पाडली.

वेतनासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या इतर समस्यांबाबतही सकारात्मक आश्वासन देण्यात आले. या वेळी कास्ट्राईब महासंघाचे केंद्रीय सहसचिव अनिल सुरळकर, रविभाऊ पोथरे, आर.टी. सोनवणे, सुनील सोनवणे, बी.ए. पानपाटील, प्रा. सत्यजित साळवे, प्रेम झंवर आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने