Top News

Breaking I HMPV व्हायरस भारतात: सात रुग्ण आढळले, महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये दोन रुग्ण आढळले


HMPV व्हायरसचा भारतात प्रवेश: सात रुग्णांची नोंद, केंद्र सरकारने जारी केला अलर्ट: राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश

नवी दिल्ली, वृत्तसंस्था: - चीनमध्ये अतिशय वेगाने पसरत असलेल्या HMPV (ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस) व्हायरसने भारतात एन्ट्री केली आहे. सध्या भारतात सात रुग्ण आढळून आले असून महाराष्ट्रातील नागपूर शहरात दोन रुग्ण आढळले आहेत. याशिवाय अहमदाबादमध्ये 1, नागपूर आणि बेंगळुरूमध्ये प्रत्येकी 2 रुग्ण, चेन्नईमध्ये 1 आणि कोलकातामध्ये 1 मुलाला HMPV व्हायरसची लागण झाली आहे.

केंद्र सरकारने या व्हायरसबाबत अलर्ट जारी केला असून राज्य आणि केंद्र सरकारला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सर्व रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत आणि त्यांना आवश्यक तेथे वैद्यकीय मदत दिली जात आहे.

कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्र सरकारने नागरिकांना घाबरण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे. तथापि, संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने राजधानीतील सर्व रुग्णालयांना योग्य तयारी करण्यास सांगितले आहे. नागपूरमध्ये 7 आणि 13 वर्षांच्या दोन मुलांना या व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या मुलांना आधी स्वाइन फ्लू झाला होता, आणि 3 जानेवारी रोजी PCR टेस्ट केल्यावर त्यांना HMPV व्हायरस आढळला.

HMPV व्हायरस: लक्षणे आणि धोके
ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) हा थंडीच्या दिवसांत जास्त वेगाने पसरतो आणि फुफ्फुसांमध्ये वेगाने पसरतो. यामुळे न्युमोनिया होण्याचा धोका वाढतो, आणि श्वास घेणं अवघड होऊ शकतं. लहान मुलं आणि वृद्ध लोक या व्हायरसपासून जास्त प्रभावित होतात. 2001 साली या व्हायरसची ओळख पटली होती.

HMPV व्हायरस संक्रमित व्यक्तीच्या खोकल्याने, शिंक दिल्याने, तसेच हात मिळविल्याने किंवा स्पर्श केल्याने पसरतो. याच्या लक्षणांमध्ये सर्दी, घशात खवखव, डोकेदुखी, ताप येणं, नाक गळणं, खोकला होणं, आणि श्वास घेणं यांचा समावेश होतो. गंभीर स्थितीमध्ये फुफ्फुसांमध्ये संक्रमण होऊन श्वसनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

विशेषत: अस्थमा आणि फुफ्फुसांचे आजार असलेल्या व्यक्तींनी या व्हायरसबाबत अतिरिक्त सर्तकता ठेवण्याची आवश्यकता आहे. HMPV व्हायरसची लक्षणं संक्रमित होण्याच्या पाच दिवसांनंतर दिसून येतात.

नागरिकांनो, काळजी घ्या!
सर्दी किंवा खोकला असल्यास, किंवा श्वास घेण्यात त्रास होत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. ह्या व्हायरसच्या लक्षणांवर लक्ष ठेवून आणि योग्य उपचार घेऊन त्यावर नियंत्रण ठेवता येईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने