वेश्या व्यवसायाच्या माहितीवरून पोलिसांनी केली कारवाई; लॉज मालकावर गुन्हा दाखल
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत सोमवारी एक मोठी कारवाई करण्यात आली. पोलीस पथकाने शहरातील सागर लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या ६ महिलांची सुटका केली, तसेच २ जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर पोलीस प्रशासनाने संबंधित लॉजवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले. या पथकाला माहिती मिळाली होती की, एमआयडीसी येथील जी सेक्टरमधील सागर लॉजमध्ये काही महिलांकडून वेश्या व्यवसाय चालवला जात आहे. पोलीसांनी या माहितीच्या आधारावर सोमवारी दुपारी या लॉजवर छापा टाकण्यात आला.
छापेमारीदरम्यान पोलिसांनी ६ महिलांना मुक्त केले, ज्यांना वेश्या व्यवसायासाठी आणले जात होते. याप्रकरणी लॉजच्या २ संशयित चालकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध वेश्याव्यवसायावर नियंत्रण ठेवणाऱ्या कायद्यांतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
या छाप्यात पोलीस पथकाने मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसायाच्या उपकरणे आणि अन्य साक्षीदार वस्तू जप्त केल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी ही कारवाई एक महत्त्वाची पाऊल म्हणून दर्शवली आहे आणि वेश्याव्यवसायाच्या विरोधात सशक्त लढा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.
याप्रकरणी अधिक तपास सुरू असून, ताब्यात घेतलेल्या संशयितांच्या चौकशीवरून अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा