Top News

पत्र्याच्या शेडमध्ये बनावट दारू तयार करणाऱ्यावर जळगाव एलसीबीची धाड



४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
शहरातील नवल नगर भागातील शिरसोली रस्त्यावर एका पत्र्याच्या शेडमध्ये बनावट देशी व विदेशी दारू तयार करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी मध्यरात्री धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपी जितेंद्र वैद्यनाथ भाट (वय ५५) याला ताब्यात घेतले आहे.

पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून, जितेंद्र भाट या पत्र्याच्या शेडमध्ये बनावट दारू तयार करत होता. यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री १:३० वाजता अचानक छापा मारला आणि भाटला अटक केली. त्याच्याकडून देशी व विदेशी कंपनीच्या बनावट दारूचा साठा तसेच दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन जप्त करण्यात आले.

या कारवाईदरम्यान पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, राजेंद्र उगले, सहायक फौजदार अतुल वंजारी, राजेश मेढे, विजय पाटील, हरीलाल पाटील, प्रमोद ठाकूर तसेच महिला पोलिस रूपाली खरे यांचा सक्रिय सहभाग होता.

पोलिसांनी आरोपीवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सध्या पोलिसांनी या प्रकरणाची अधिक तपासणी सुरू केली आहे, तसेच बनावट दारूच्या उत्पादन आणि विक्रीविरोधी कठोर कारवाईची तयारी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने