काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गटारी समस्येवर महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना केली जात नाही, स्थानिक रहिवाशांची नाराजी
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील नवीन बीजे मार्केट येथील बेसमेंटमधील हनुमान मंदिराजवळ असलेल्या भागात गटारीचे घाण पाणी साचत होते. हे घाण पाणी रहिवाशांच्या दुकानदारांच्यासमोर आल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गटारीच्या समस्या बाबत जळगाव शहर महापालिकेला अनेक वेळा तक्रार देण्यात आली आहे. महापालिका व संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे येथील स्थानिक रहिवाशांनी 'जळगाव अपडेट न्यूज' च्या प्रतिनिधीला सांगितले.
रहिवाशांचे म्हणणे आहे की, गटारीसंबंधी असलेल्या या समस्येला तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अन्यथा पुढील काळात यामुळे आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे, या भागात असलेले दुकानदार देखील या घाण पाण्यामुळे त्यांचा व्यवसाय खोळंबला आहे. महापालिकेने त्वरित या समस्येचे निराकरण करण्याची आवश्यकता असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.
नागरिकांना या प्रकाराच्या समस्यांसाठी तक्रारी करणं, व महापालिकेने त्या समस्यांवर लक्ष देणे आवश्यक असले तरी, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. स्थानिक रहिवाशांनी महापालिकेला पुन्हा एकदा विनंती केली आहे की, गटारीच्या समस्या लवकर सोडवून त्यांची स्थिती सुधारण्यात यावी.
टिप्पणी पोस्ट करा