प्रत्येकाला मनासारखा पद मिळावे अशी अपेक्षा" - माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I महायुती सरकारच्या पक्षातील नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव आणि विश्वासार्हतेच्या मुद्द्यांमुळे पालकमंत्री पदाच्या घोषणेसंबंधी विलंब होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी केला.
"महायुती सरकारच्या पक्षातील नेत्यांमध्ये विश्वासार्हतेचा अभाव असून, त्यामुळे पालकमंत्री घोषित करण्यात आले नाही," अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली. त्यांनी पुढे सांगितले की, जरी पालकमंत्री घोषित केल्यास, त्या पदाचा स्वीकार करायचा की नाही याबाबत सुद्धा शंका आहे, कारण प्रत्येकाला त्याच्या इच्छेनुसार पालकमंत्री पद मिळावे अशी अपेक्षा आहे.
आ. खडसे यांच्या या वक्तव्यानंतर महायुती सरकारतील अंतर्गत संघर्ष आणि समन्वयाचा अभाव आणखी एकदा चर्चेचा विषय बनला आहे.
टिप्पणी पोस्ट करा