Top News

जळगावात दोन कुटुंबांत क्षुल्लक कारणावरून तुंबळ हाणामारी; ६ जण जखमी


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरात २९ मार्च रोजी पिंप्राळा हुडको परिसरात किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले असून, एकमेकांना लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली. या घटनेत दोन्ही गटांतील एकूण ६ जण जखमी झाले आहेत. दोन्ही बाजूंनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारींनंतर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नेमकी घटना काय?

पहिला गटातील उस्मान शहा इब्राहिम शहा (५५) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलीचे आरिफ नादर शेख यांच्या मुलासोबत भांडण सुरू होते. उस्मान शहा आणि त्यांचा मुलगा त्यांना समजावण्यासाठी गेले असता, तीन जणांनी त्यांना शिवीगाळ करत लोखंडी पाईपने मारहाण केली. या तक्रारीवरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दुसरा गटातील जुबेर शेख हकीम (३०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, उस्मान शेख आणि त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या तक्रारीच्या आधारे चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने