जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I उन्हाळी सुट्टीचा योग्य उपयोग करत मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी ‘मेजर स्पोर्ट्स क्लब’तर्फे उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत हे शिबिर दररोज सायंकाळी ५.१५ ते ८.३० या वेळेत होणार असून, ४ वर्षांवरील मुलांसाठी प्रवेश खुला आहे.
या शिबिरामध्ये स्केटिंग, डान्स, कराटे, चेस तसेच योगा व झुंबा यांसारख्या विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. मुलांच्या बौद्धिक व शारीरिक विकासासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असून, त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.
शिबिराच्या माध्यमातून खेळाडूंची क्षमता वाढविणे, त्यांना स्पर्धांसाठी तयार करणे तसेच मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे. यासोबतच खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवण्याची हमी आयोजकांनी दिली आहे.
या प्रशिक्षणामुळे मुलांची शारीरिक क्षमता, एकाग्रता, निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे, महिलांसाठी ‘लेडीज स्पेशल समर फिटनेस कॅम्प’चेही आयोजन करण्यात आले असून, योगा आणि झुंबा यांच्या माध्यमातून फिटनेसवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तसेच मोफत वैयक्तिक डाएट प्लॅन, आठवड्याला रिजल्ट ट्रॅकिंग आणि वजन तसेच इंचेस कमी करण्यासाठी मार्गदर्शन दिले जाणार आहे.
स्केटिंग आणि कराटेचे नियमित वर्ग वर्षभर सुरू राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर प्रवेश नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी प्रशिक्षक विशाल मोरे यांच्याशी ९८३४७३४९४४ किंवा ७२७६१६६४८३ या क्रमांकांवर संपर्क साधावा. शिबिराचे आयोजन मेजर स्पोर्ट्स क्लब, बँक ट्रॅक स्केटिंग रिंक, भगीरथ इंग्लिश स्कूलजवळ, कलेक्टर बंगल्याच्या मागे, जळगाव येथे करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा