समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I सकल जैन श्री संघ यांच्या वतीने आयोजित तीर्थंकर प्रभू श्री महावीर स्वामी यांच्या २६२५ व्या जन्मकल्याण महोत्सवात रविवारी (दि. २९ मार्च) सायंकाळी भजन संध्या झाली. याप्रसंगी भगवान महावीर यांच्यावरील भक्ती गीते सादर करण्यात आली.
खानदेश सेंट्रलमध्ये आयोजन करण्यात आले होते. इंदूर येथील ऋषभ व संभव जैन यांनी भगवान महावीर यांच्यावरील भक्ती गीते सादर केली. त्यांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. कार्यक्रमासाठी श्री जैन रत्न युवक परिषद आणि जितो युथ विंग यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी सकल जैन समाजाचे संघपती दलुभाऊ जैन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी खासदार ईश्वरलाल जैन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, नयनतारा बाफना, सुशील बाफना, माजी आमदार मनीष जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी, जन्मकल्याण महोत्सव समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ बाफना, स्वरूप लुंकड, मूर्तिपूजक संघाचे अध्यक्ष ललित लोढाया, दिगंबर जैन संघाचे अध्यक्ष आशिष जैन, तेरापंथ सभेचे अध्यक्ष पवन शामसुखा, पारस टाटिया, सुरेश बंब, भारती रायसोनी, आशिष भंडारी, शशी बाफना, विभूती बाफना, दिलीप गांधी, प्रदीप मुथा, अॅड. सुनील चोरडिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सजीव देखावे, ध्वज पथक, बासरी वादन...
३१ रोजी मंगळवारी शोभायात्रेत भगवान रथ, सजीव देखावे, बँड पथक, ध्वज पथक असतील. याप्रसंगी भजन व प्रथमच बासरी वादनाचे सादरीकरण केले जाणार आहे. सकल जैन समाज शोभायात्रेत सहभागी होणार आहे.
सायंकाळी महाआरती, झुला उत्सव...
मंगळवारी सायंकाळी ७ वाजता तीर्थंकर प्रभू श्री महावीर स्वामी यांची महाआरती व पाळणा झुलविण्याचा उत्सव दादावाडी येथील भाग्यवर्धन पार्श्वनाथ जिनालयात, तर रात्री ८ वाजता झुला उत्सव वितराग भवन, लाल जैन मंदिर याठिकाणी होईल.
मान्यवरांचे संबोधन...
खानदेश सेंट्रलमध्ये ३१ रोजी ८:४५ वाजता रक्तदान शिबिर, ९ वाजता ध्वज वंदन व मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. याप्रसंगी प्रमुख वक्ता फोर्स मोटर्सचे चेअरमन डॉ. अभय फिरोदिया हे उपस्थितांना संबोधित करतील. अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुरेशदादा जैन राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून समाजातील मान्यवरांची उपस्थिती राहील. यानंतर सकाळी ११:३० ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान गौतम प्रसादी होईल.
१ एप्रिलला णमोकार महामंत्र जप
आचार्य श्री रामलालजी म. सा. यांच्या जन्मदिनानिमित्त दि. १ एप्रिलला सकाळी ८ वाजता जिल्हा रुग्णालय व निरीक्षण गृहात फळ वाटप, १०:३० ते ११ वाजेच्या दरम्यान णमोकार महामंत्र जप सागर भवनमध्ये केला जाईल.
टिप्पणी पोस्ट करा