Top News

फ्रेंड सर्कल बहुउद्देशीय संस्थेच्या क्रिकेट प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद; विजेत्यांचा सन्मान

टी-ट्वेंटी वर्ल्ड कप सामन्यांवर आधारित स्पर्धेत ५०० पेक्षा अधिक समाज बांधवांचा सहभाग

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I फ्रेंड सर्कल बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट विषयावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेला समाज बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील सामन्यांवर आधारित या स्पर्धेत जवळपास ५०० हून अधिक समाज बांधवांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत अनेकांनी आपले क्रिकेट ज्ञान आजमावले, त्यापैकी काहींना यश तर काहींना अपयश आले.
या स्पर्धेतील विजेते म्हणून मुकेश वाणी, यश वाणी आणि अक्षरा वाणी यांची निवड करण्यात आली. विजेत्यांचा सन्मान फ्रेंड सर्कल संस्थेच्या वतीने तसेच समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने विविध बक्षिसे देऊन करण्यात आला.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रकाश रामदास वाणी यांनी २५१ रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. तसेच एका समाज बांधवाने नाव जाहीर न करता स्पोर्ट्स टोपीचे बक्षीस दिले. युवा उद्योजक निलेश ट्रेडर्सचे संचालक नंदकिशोर पंडित यांनी प्रत्येक विजेत्याला ट्रान्सपरंट पॅड देण्याची घोषणा केली.

याशिवाय सचिन चंदुलाल वाणी यांनी महिला विजेत्यास नेकलेस सेट तर पुरुष विजेत्यास बेन्टेक्स चैन देण्याचे जाहीर केले. कल्पेश झेरॉक्सचे संचालक मनोज वाणी यांनी लेदर (वॉलेट) पाकीट देण्याचे जाहीर केले, तर फ्रेंड सर्कल संस्थेकडून आकर्षक रनिंग शूज देण्यात आले. तसेच वाणी प्रीमियर लीग फायनल मॅच निमित्त कु. अक्षरा वाणी यांना ५०० रुपयांचे विशेष बक्षीस देण्यात आले.

या उपक्रमासाठी मनोज सुधाकर वाणी, राजेश वाणी, योगेश वाणी, श्रीकृष्ण बाविस्कर, पराग वाणी, प्रवीण चंदनकर, प्रदीप वाणी, राहुल हरणे, ललित वाणी, भूषण हरणे, महेंद्र वाणी तसेच संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र वाणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण काथार वाणी समाजसेवा संघाचे जळगाव अध्यक्ष अमोल चंद्रकांत वाणी यांच्या हस्ते तसेच मोनाली कामवासकर फाउंडेशनचे अध्यक्ष सुधाकर पंढरीनाथ वाणी आणि फ्रेंड सर्कलचे सचिव मनोज सुधाकर वाणी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी आयोजकांनी सर्व प्रायोजक व समाज बांधवांचे आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने