Top News

पेट्रोल पंपावर अचानक बेशुद्ध पडल्याने ६४ वर्षीय व्यापाऱ्याचा मृत्यू

जळगाव शहरातील मोहाडी रस्त्यावरील पेट्रोल पंपावरील घटना 

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील रायसोनी नगर परिसरातील रहिवासी आणि परिचित किराणा व्यापारी विरेंद्र रुढाभाई जैठवा (वय ६४) यांचे बुधवारी दुपारी अचानक प्रकृती बिघडल्याने निधन झाले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून जैठवा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

माहितीनुसार, विरेंद्र जैठवा हे आपल्या वाहनात पेट्रोल भरण्यासाठी मोहाडी रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर गेले होते. पेट्रोल भरत असतानाच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. ही घटना पाहताच पंपावरील कर्मचारी व नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, त्यांची प्रकृती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच मुलगा वैभव जैठवा यांनी त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात हलविले. मात्र तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गफुर तडवी करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने