जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते मदत प्रदान; 42 विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवारी (दि. 14 मार्च 2026) जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक बांधिलकी जपत मदत व शैक्षणिक साहित्य वितरणाचा उपक्रम राबविण्यात आला.
एरंडोल तहसील कार्यालयात कार्यरत असलेले दिवंगत महसूल सहाय्यक कै. शिवाजी महाजन यांच्या अपघाती निधनानंतर जिल्हाभरातील महसूल कर्मचारी बांधवांनी एकत्र येत मदत निधी जमा केला होता. या निधीतून ₹2 लाख 64 हजारांची आर्थिक मदत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते महाजन यांच्या कुटुंबीयांना प्रदान करण्यात आली.
यावेळी जळगाव शहरातील कन्या छात्रालयातील एकूण 42 विद्यार्थिनींना शालेय दप्तर, वह्या, कंपास बॉक्स तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा जळगाव यांच्या माध्यमातून तसेच शहरातील दानशूर अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने पार पडला.
कार्यक्रमास महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष योगेश्वर नन्नवरे, उपाध्यक्ष किरण बाविस्कर, कार्याध्यक्ष अतुल सानप, खजिनदार घनश्याम सानप, सरचिटणीस दिपक चौधरी, प्रसिद्धी प्रमुख गणेश हटकर, कायदेविषयक सल्लागार नम्रता नेवे, जळगाव तालुका अध्यक्ष संजय अंभोरे, ॲड. दीपक सपकाळे, भारतीय स्टेट बँकेचे गजानन पाटील, कॅनरा बँकेचे चंद्रकांत सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रदीप बाविस्कर, रितेश छाजेड तसेच व्यावसायिक सदस्य राहुल नवगिरे, महेश सपकाळे, सुरेश महाले, महेश विसपुते, सुनिल निकम, चंद्रकांत खैरे, निलेश केदार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समन्वयाची जबाबदारी जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक अमोल जुमडे यांनी पार पाडली.
टिप्पणी पोस्ट करा