जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे अवैध वाळू उपसा सुरू असल्याची तक्रार प्राप्त होताच तत्काळ कारवाई करण्यात आली. सकाळपासूनच संबंधित भागात खबरी ठेवून हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. माहितीची खात्री झाल्यानंतर थेट नदीपात्रात जाऊन वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र आणि दोर ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईदरम्यान दोर व इतर साहित्य जागीच नष्ट करण्यात आले. जप्त केलेले यंत्र अधिकाऱ्यांच्या वाहनात टाकून प्रशासकीय इमारतीत जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सदर कारवाईसाठी विनय गोसावी हे स्वतः सुमारे तीन तास घटनास्थळी उपस्थित राहून पाहणी व मार्गदर्शन करत होते. तसेच गावातील पोलीस पाटील आणि काही स्थानिक तरुणांना सतर्क करून वाहने आल्यास तात्काळ कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या धडक कारवाईमुळे वडनगरी परिसरात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, पुढील काळातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा