शहरी बेघर निवारा केंद्र व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून, संत गाडगे महाराज शिक्षण सांस्कृतिक क्रीडा मंडळ संचलित संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र, जळगाव आणि शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगे महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त सर्वरोग निदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत आयोजित कार्यक्रमात संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित लाभार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण करण्यात आले.
या उपक्रमास मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उपायुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त धनश्री शिंदे तसेच शहर अभियान व्यवस्थापक सौ. गायत्री पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. मंडळाचे संचालक प्रशांत गायकवाड तसेच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्रशासकीय निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
शिबिरात डॉ. राहुल चौधरी, डॉ. निलेश थोरात, डॉ. कार्तिकेश्वरी अन्नेवार, डॉ. शरयू विसपुते यांच्यासह वैद्यकीय पथकाने लाभार्थ्यांची तपासणी केली. तसेच कल्पेश नेरे (अधिपरिचारिका), पवन बनकर, प्रतिक वऱ्हाडे, अंकिता कातकाडे, संध्या भोसले (आंतरवासीय विद्यार्थी), समाधान पवार (ड्रेसर), चेतन तांबोळी व विशाल गवळी (औषध वितरक), सागर कऱ्हाळे (वाहनचालक) यांनी सहकार्य केले.
संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी, काळजीवाहक राजेंद्र मराठे, हर्षल वंजारी, सौ. शितल काटे, किरण मोरे तसेच सर्व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरामुळे बेघर व गरजू नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचाराचा लाभ मिळाला असून, सामाजिक बांधिलकी जपत जयंती साजरी करण्याचा आदर्श उपक्रम ठरला.
टिप्पणी पोस्ट करा