Top News

ब्रेकिंग I मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर जळगावात ३८ वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव तालुक्यातील भोलाणे गावातील बस स्थानकाजवळ सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बाळू सदाशिव कोळी (वय ३८) यांचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या खुनामागे त्यांच्याच जवळच्या मित्राचा हात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत बाळू कोळी यांना तत्काळ जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणात आकाश नावाच्या व्यक्तीवर संशय व्यक्त करण्यात येत असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला आहे.

दरम्यान, खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून संशयित आरोपीची चौकशी व पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे भोलाणे गावात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने