Top News

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I कंजरभाट समाज युवा फाउंडेशनच्या वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन कंजरभाट समाज समाजमंदिर येथे अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. नथ्थु रायचंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी तिरंग्याला मानवंदना देत “भारत माता की जय” व “वंदे मातरम्”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी समाजाचे उपाध्यक्ष बिरजू नेतलेकर, विजय दहियेकर, राकेश तमायचे, मोहन चव्हाण, फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रदीप नेतलेकर, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, सचिव राहुल नेतलेकर यांच्यासह नरेश बागडे, विजय अभंगे, उमेश माछरेकर, संदीप गारुंगे, वीर दहियेकर, संदीप बागडे, गणेश बागडे, सुमित माछरे, गोपाल बाटूंगे, विनोद माछरेकर, राज नेतले, पंकज नेतलेकर आदी उपस्थित होते.

तसेच प्रतिभा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. एस. बाविस्कर, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नंदा पाटील, संजयसिंग पाटील विद्यालयाचे शिक्षक-शिक्षिका व कर्मचारीवर्ग यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राकेश भाट, गोविंदा रायचंदे, जितू नेतले, अंकुश माछरे, नितीन बागडे, गौरव रायचंदे, घनश्याम बागडे, अनुराग रायचंदे, प्रितेश बागडे, आयन बागडे, मोनू रायचंदे तसेच महिला भगिनी यशोदा गागडे, संगीता रायचंदे, रोहिणी गुमाने आदींनी विशेष परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने युवक व समाजबांधव उपस्थित होते.

याप्रसंगी देशाची एकता, संविधान व लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश बागडे यांनी केले तर आभार उमेश माछरेकर यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने