जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जुन्या वादाच्या कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीत दगड, विटा, लोखंडी सळई तसेच लाकडी दांडक्यांचा वापर करून जोरदार हाणामारी करण्यात आली. ही घटना रविवारी १९ जानेवारी रोजी दुपारी सुमारे ४ वाजता तालुक्यातील नशिराबाद गावाच्या इस्लामपूरा भागात घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीनुसार दोन्ही गटांतील एकूण ३१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या गटातील फिर्यादी गुलाम गौस शेख अमीन (वय २३, रा. इस्लामपूरा, नशिराबाद) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जुन्या भांडणाच्या कारणावरून अरफाद (पूर्ण नाव माहित नाही), हमीद शेख, मोईन शेख, बबलू शेख, अकीब शेख, गज्जू उर्फ गुलाम गोस, आवेश शेख, अबुजर शेख, हरीश शेख, रिजवान शेख, मुस्तकीम शेख, ममदू शेख गनी व समीर शेख (सर्व रा. इस्लामपूरा, नशिराबाद) यांनी बेकायदेशीर जमाव करत लोखंडी रॉड, लाकडी काठ्या व विटांच्या सहाय्याने गुलाम गौस शेख अमीन व त्यांच्या नातेवाईकांवर हल्ला केला.
तर दुसऱ्या गटातील फिर्यादी रिजवान रऊफ खान (वय २८, रा. इस्लामपूरा, नशिराबाद) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जुन्या वादातून आसिफ सैय्यद, आमीन शेख बाबू, सलीम शेख बाबू, आरिफ अली, दानिश शेख, गुलाब अमीन, नदीम सलीम, बाबा (पूर्ण नाव माहित नाही), नावीद सैय्यद, वारीस सैय्यद, रशिद अली, अझर अली, आयान सैय्यद, नईम बाबू, रफिक अली, अख्तर अली व मुस्तफा नईम (सर्व रा. नशिराबाद) यांनी लोखंडी रॉड, दगड, विटा व लाकडी काठ्यांच्या सहाय्याने रिजवान रऊफ खान व त्यांच्या नातेवाईकांवर हल्ला केला.
या हाणामारीत दोन्ही गटांतील अनेक जण जखमी झाले असून जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन्ही गटांतील एकूण ३१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार अतुल महाजन करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा