Top News

प्रभाग १३ ‘ड’ मधील उमेदवार जितेंद्र मराठे यांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक १३ ‘ड’ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या जितेंद्र भगवानराव मराठे यांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ आज नारळ फोडून करण्यात आला. हा कार्यक्रम आज दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी नेहरू नगर येथील दत्त मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला.
या प्रचार शुभारंभ प्रसंगी प्रभागातील नागरिक, ज्येष्ठ मंडळी, तरुण वर्ग तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. ‘जितेंद्र मराठे मित्र परिवार’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रचाराच्या शुभारंभानंतर आदर्श नगर, गणपती नगर, नेहरू नगर, रायसोनी नगर व मोहन नगर या परिसरांमध्ये जनसंवाद फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीदरम्यान जितेंद्र मराठे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा व सूचनांचा आढावा घेतला. परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जनसंवाद फेरीला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला.
प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार जितेंद्र मराठे यांनी यावेळी व्यक्त केला. विकास, पारदर्शकता आणि लोकाभिमुख प्रशासन हे आपल्या प्रचाराचे मुख्य मुद्दे असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक १३ ‘ड’ मधील नागरिकांनी दिलेल्या प्रेम, विश्वास व पाठिंब्याबद्दल जितेंद्र भगवानराव मराठे यांनी मनःपूर्वक आभार मानले असून, पुढील काळातही नागरिकांच्या सहकार्याने प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने