Top News

जळगाव महापालिका निवडणूक रणधुमाळीत ‘कैची’ ठरणार निर्णायक शस्त्र

प्रभाग क्रमांक १३ ‘ब’ मधून अपक्ष उमेदवार सौ. हर्षाताई उदय पवार यांना ‘कैची’ निशाणी मिळताच प्रचाराला वेग

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १३ ‘ब’ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सौ. हर्षाताई उदय पवार यांच्या प्रचाराला आज निर्णायक कलाटणी मिळाली आहे. निवडणूक आयोगाकडून आज चिन्ह वाटप करण्यात आले असून, सौ. हर्षाताई पवार यांना ‘कैची’ (Scissors) ही प्रभावी आणि ठळक ओळख असलेली निवडणूक निशाणी मिळाली आहे. निशाणी जाहीर होताच प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, “आता गैरकारभाराची कैचीने छाटणी होणार,” अशा घोषणा समर्थकांकडून दिल्या जात आहेत.

कैची ही फक्त कापण्यासाठीची वस्तू नसून, ती चुकीच्या गोष्टी तोडण्याचे आणि योग्य निर्णय घेण्याचे प्रतीक मानली जाते. प्रभागातील रखडलेली कामे, वाढता भ्रष्टाचार, आणि अन्यायकारक पद्धती यांना ‘कैची’ लावून स्वच्छ, पारदर्शक कारभार करण्याचा निर्धार सौ. हर्षाताई पवार यांनी केला आहे. त्यामुळे ही निशाणी त्यांच्या ठाम भूमिकेचे प्रतीक ठरत आहे.
“जे चुकीचे आहे ते कापायचे आणि जे योग्य आहे ते जोडायचे, हीच हर्षाताईंची भूमिका आहे,” अशी भावना मतदार व्यक्त करत आहेत.

“हातात कैची, मनात विकास!”

निशाणी मिळाल्यानंतर मतदारांकडून बोलक्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एका महिला मतदाराने सांगितले,
“कैची अचूक कापते. हर्षाताई सुद्धा तशाच आहेत. कामात स्पष्ट, निर्णयात ठाम आणि अन्यायाविरुद्ध निर्भीड. त्यामुळे हे चिन्ह त्यांना अगदी शोभून दिसते.”

घराघरात ‘कैची’, मनात हर्षाताई!

अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवताना कोणती निशाणी मिळेल, याबाबत उत्सुकता होती. मात्र ‘कैची’ ही निशाणी सर्वसामान्यांच्या रोजच्या वापरातील असल्याने ती मतदारांच्या सहज लक्षात राहणारी ठरली आहे. ईव्हीएमवरील चिन्ह ओळखणेही मतदारांसाठी सोपे झाले आहे. “बटण दाबणार कैचीवर, आणि विकास होणार वेगावर!” अशा घोषणांनी आता प्रभाग क्रमांक १३ ‘ब’ दणाणून गेला आहे.

संयमी नेतृत्व, ठाम निर्णय आणि आता ‘कैची’ हाती!

सौ. हर्षाताई उदय पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करतानाही कोणताही गाजावाजा न करता शांत आणि सुसंस्कृत पद्धतीने प्रक्रिया पूर्ण केली होती. चिन्ह मिळाल्यानंतरही त्यांनी प्रचारात भपकेबाजी टाळत थेट मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला आहे.
आगामी मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीनवरील ‘कैची’ या निशाणीसमोरील बटण दाबून प्रभाग क्रमांक १३ ‘ब’ मध्ये परिवर्तनाची नवी सुरुवात होणार, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने