जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I प्रभाग क्रमांक ७ मधील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांपासून ते मोठ्या विकासकामांपर्यंत सातत्याने झटणारे, विद्यार्थी दशेपासून समाजकारणात सक्रिय असलेले व पालिकेचा प्रत्यक्ष अनुभव असलेले रवींद्र (बंटी) विष्णू नेरपगारे यांनी आगामी महापालिका निवडणूक लढवण्याचा मनोदय जाहीर केला आहे.
“राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे” या तत्त्वावर काम करत त्यांनी आजवर जनतेचा विश्वास मिळवला असून, हाच विश्वास बळावर घेऊन ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते असलेले बंटी नेरपगारे यांना आमदार राजू मामा भोळे यांच्या विश्वासातून महापालिकेच्या प्रभाग समिती सदस्यपदाची संधी मिळाली. ही संधी त्यांनी केवळ पदापुरती न ठेवता प्रत्यक्ष कामातून सार्थ ठरवली. प्रभागातील मूलभूत प्रश्न, नागरी सुविधा, आरोग्य, पाणी, रस्ते, वाहतूक, सुरक्षा अशा सर्व विषयांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
कोरोना काळात तर त्यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण निर्माण केले. नागरिकांच्या आरोग्यासाठी होमिओपॅथिक गोळ्यांचे तब्बल ५ हजार बॉटल मोफत वाटप, संपूर्ण परिसरात हायपो क्लोराईड सॅनिटायझर फवारणी, गरजू नागरिकांना मदत, अशा अनेक उपक्रमांत ते अग्रभागी होते. संकटाच्या काळात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.
प्रभागातील विकासकामांच्या बाबतीतही त्यांनी ठोस कामगिरी बजावली आहे. शिव कॉलनी स्टॉप येथे अंडरपाससाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा, रेल्वे पुलाच्या कामासाठी प्रयत्न,
रात्री येणारे पाणी दिवसा मिळावे यासाठी यशस्वी पाठपुरावा, आमदार निधीतून हायमास्ट दिवे व नागरिकांसाठी बसण्याची सुविधा, अपघातप्रवण भागात ट्रॅफिक सिग्नल,
समांतर रस्त्यांसाठी पाठपुरावा – अशी अनेक कामे त्यांच्या कार्यकाळात मार्गी लागली आहेत.
सामाजिक व धार्मिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग आहे. खंडित झालेला भागवत सप्ताह पुन्हा सुरू करणे, रुद्रेश्वर महादेव मंदिराची दगडी उभारणी, हर घर तिरंगा, भगवा ध्वज वाटप, विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले गेले आहेत.
विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवत आलेले बंटी नेरपगारे यांनी महाविद्यालयीन जीवनात आंदोलन, मोर्चे, रस्ता रोको यामधून अन्यायाविरोधात भूमिका घेतली. आजही ते सामाजिक, शैक्षणिक व नागरी प्रश्नांवर सातत्याने सक्रिय आहेत.
“आमदार राजू मामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक ७ आदर्श प्रभाग म्हणून विकसित करण्याचा माझा संकल्प आहे. नागरिकांचा आशीर्वाद मिळाल्यास त्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी मी सदैव उपलब्ध राहीन,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
जनतेच्या विश्वासावर उभा असलेला, कामातून ओळख निर्माण करणारा आणि विकासाला प्राधान्य देणारा नेता म्हणून रवींद्र (बंटी) नेरपगारे हे नाव आता प्रभाग ७ मध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
टिप्पणी पोस्ट करा