Top News

बिलवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कविता कोमलसिंग पाटील यांची बिनविरोध निवड

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव तालुक्यातील वावडदे जवळ असलेल्या बिलवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कविता कोमलसिंग पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दिनांक २४ रोजी पार पडलेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

या निवड प्रक्रियेदरम्यान ग्रामपंचायतीचे सरपंच दिनोद श्रावण पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पल्लवी समाधान पाटील, धोंडू जगताप, अनिल गुलाब पाटील, रविंद्र हिलाल गोपिळ, सुपडू गुलसिंग गायकवाड, अमोल उमरे, लताबाई महादू पाटील यांची उपस्थिती होती.

निवडणूक अधिकारी म्हणून निरचंद्रशेखर प्रकाश वराडे यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडली. ग्रामपंचायत अधिकारी यांनी प्रशासकीय कामकाज पाहिले.

कविता कोमलसिंग पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. विकासकामांना गती देण्याचा आणि गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनीही नवनियुक्त उपसरपंच यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या असून, बिलवाडी गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने