Top News

किरकोळ वादातून एकाच्या डोक्यात मारली काचेची बाटली, दोन गंभीर जखमी

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील कानळदा रोडवरील लक्ष्मीनगर परिसरात एका किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात काचेची बाटली फोडून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना दि. ९ डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी संशयित तनवीर उर्फ तन्या शेख रहीम (रा. गेंदालाल मिल) याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळाजवळच राहणारा वैभव रविंद्र जैस्वाल (वय २१, रा. लक्ष्मीनगर) याची परिसरात पानटपरी आहे. दि. ९ रोजी रात्रीच्या सुमारास तनवीर शेख हा त्या ठिकाणी आला. कोणतेही स्पष्ट कारण नसताना त्याने वैभव जैस्वाल याच्याशी वाद घातला. वाद वाढत जाऊन संशयिताने जैस्वाल याची कॉलर पकडून त्याला मारहाण केली. यामध्ये वैभवच्या हातात असलेली काचेची बाटली हिसकावून ती त्याच्या डोक्यात फोडल्याने तो गंभीर जखमी झाला.

जखमी अवस्थेत वैभव जैस्वाल याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीनंतर तनवीर उर्फ तन्या शेख रहीम याच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ प्रकाश वाघ करीत आहेत.

या घटनेमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस पुढील तपासाद्वारे प्रकाराचे कारण आणि घटनेमागील पार्श्वभूमी शोधत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने