जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I तालुक्यातील सुजदे येथे मंगळवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत सहा वर्षांच्या प्रेम नरेंद्र सोनवणे या चिमुकल्याचा विद्युत प्रवाह लागून मृत्यू झाला. घराबाहेरील पत्र्याच्या शेडमध्ये खेळत असताना ही घटना घडली. दुपारी साडेचारच्या सुमारास मुख्य विद्युत तार अचानक तुटून त्या शेडवर पडली आणि पत्र्यातून प्रवाह उतरल्याने प्रेमला जोरदार धक्का बसला.
घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी तत्काळ वीजपुरवठा बंद करून प्रेमला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
प्रेमचे वडील नरेंद्र सोनवणे हे शेती व्यवसाय करतात व आई गृहिणी आहे. दोन मुलांपैकी प्रेम हा मोठा होता. चिमुकल्याच्या अचानक मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंब तसेच गावातही शोककळा पसरली असून पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा