जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव महानगरपालिका निवडणुकीची धामधूम शिगेला पोहोचली असून मंगळवार (दि. ३० डिसेंबर २०२५) रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी निवडणूक कार्यालयात मोठी वर्दळ पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ मधून चेतन सुरेश महाले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांच्या विश्वास व पाठिंब्यावर चेतन महाले यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. स्थानिक विकास, नागरिकांच्या मूलभूत समस्या आणि पारदर्शक प्रशासन हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू असणार आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा तसेच युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम यांवर विशेष भर देण्याचा त्यांचा निर्धार आहे.
यंदाच्या निवडणुकीत चेतन महाले यांनी विकासाचे स्पष्ट आणि दूरदृष्टीपूर्ण व्हिजन समोर ठेवून प्रचाराची आखणी केली असून, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक १ मधील निवडणूक लढत अधिक चुरशीची आणि लक्षवेधी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा