Top News

एमआयडीसीतील बॅग लिफ्टिंग प्रकरण उघड; एलसीबीची आठ लाखांची रोख रक्कम हस्तगत

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेला बॅग लिफ्टिंगचा गंभीर गुन्हा अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या कब्जातून तब्बल आठ लाख रुपयांची रोख रक्कम जशीच्या तशी हस्तगत करण्यात आली आहे.

घटना अशी घडली
१५ नोव्हेंबर २०२५ रोजी विलास मधुकर जाधव (वय ६७, रा. जुनी जोशी कॉलनी) हे मोठी रोकड घेऊन जात असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांची बॅग लंपास केली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ८४१/२०२५ अन्वये BNS कलम ३०९(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने गुन्हा उघड करण्याचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी एलसीबीचे स्वतंत्र पथक तयार करून तपासाचा धागा पकडला. तपासदरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे २३ नोव्हेंबर रोजी पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेतले:

१) विजय शांताराम पाटील (४१), रा. कलावसंत नगर, जळगाव
२) जितेंद्र छोटूलाल जाधव (४४), रा. ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड, जळगाव

कसून चौकशीदरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली देत फिर्यादीकडून हिसकावून नेलेली ₹८,००,०००/- रोख रक्कम काढून दिली. मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपींना पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत सहभागी अधिकारी 
पोउनि: शरद बागल, सोपान गोरे, हेड कॉन्स्टेबल: प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, सलीम तडवी, कॉन्स्टेबल: सिध्देश्वर डापकर, रतनहरी गिते, मयुर निकम, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे,नेत्रम — पोकों पंकज खडसे, मुबारक देशमुख, कुंदनसिंग बयास, सायबर सेल — पोकों गौरव पाटील, मिलिंद जाधव.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने