Top News

५० पेक्षा जास्त पोलिसांची अचानक धडक, १० जण पोलिसांच्या जाळ्यात

 
मुक्ताईनगर, वरणगाव, सावदा व बोदवड पोलिसांची पहाटेची संयुक्त कारवाई

जळगाव अपडेट न्यूज, प्रतिनिधी I बोदवड शहरात तसेच तालुक्यातील विविध गावांमध्ये गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी पोलिसांनी पहाटे ४ ते ७ वाजेदरम्यान मोठ्या प्रमाणावर कोंबिंग ऑपरेशन राबवले. भोईवाडा, भिल्लवाडा परिसरात दंगल नियंत्रण पथकासह ५० हून अधिक पोलिसांनी अचानक धडक कारवाई करत परिसरात तपासणी केली. या मोहिमेत १० जणांना ताब्यात घेण्यात आले.

बोदवड शहरासोबतच नाडगाव, सोनोटी आणि उजनी येथेही ही मोहीम राबवण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष ढेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली २३ नोव्हेंबर रोजी पहाटेची ही कारवाई पार पडली. बोदवड, वरणगाव, सावदा आणि मुक्ताईनगर पोलिस ठाण्यांचे पथक तसेच आरसीपी पथक मिळून ४ अधिकारी आणि ४० अंमलदार या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते. गुन्ह्यात पाहिजे असलेल्या ७ आरोपींचा शोध घेण्यात आला; मात्र ते अद्याप मिळून आले नाहीत. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्येही कोंबिंग ऑपरेशन सुरू ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. सोनोटी, उजनी, बोदवड शहर, भिलाटी आणि नांदगाव भागात पोलिसांनी सखोल तपास केला. या कारवाईमध्ये खालीलप्रमाणे एकूण १० कार्यवाही करण्यात आली. एनबीडब्ल्यू (नॉन-बेलेबल वॉरंट) – ३, स्ट्रीशीटर – ३, संशयित – २, दारूबंदी उल्लंघन – २ याशिवाय पोलिसांनी एक कार व विनानंबरची एक मोटारसायकल ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी सांगितले की, गुन्हेगारांना भीती दाखवणे, गुन्हे रोखणे व शांतता राखणे या उद्देशाने अशा प्रकारच्या मोहिमा पुढील काळातही राबवण्यात येणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने