Top News

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगावतर्फे ‘आंबापाणी’ येथे जनजातीय गौरव दिनाचे आयोजन

आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अधिकारी व न्यायालयीन पथकाचा दौरा

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I स्वातंत्र्याच्या लढ्यात मोलाचा वाटा उचलणारे आदिवासी जननायक वीर बिरसा मुंडा यांच्या जन्मदिनी देशभर साजरा होणारा जनजातीय गौरव दिन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या वतीने यंदा यावल तालुक्यातील दुर्गम ‘आंबापाणी’ या आदिवासी बहुल गावात उत्साहात साजरा करण्यात आला. 

एम. क्यू. एस. एम. शेख (अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जळगाव) यांच्या मार्गदर्शनानुसार आणि निर्देशांनुसार हा सामाजिक उपक्रम दि. १६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. पवनजी बनसोड उपस्थित होते. त्यांच्या आगमनानंतर आदिवासी बांधवांनी पारंपारिक नृत्याने भव्य स्वागत केले. स्त्री-पुरुषांनी परंपरागत पोशाखात सादर केलेले नृत्य कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

आदिवासी वस्तीचे प्रत्यक्ष निरीक्षण – समस्या सादर
सचिव पवनजी बनसोड यांनी संपूर्ण आदिवासी वस्तीचे प्रत्यक्ष निरीक्षण करून राहणीमान, मूलभूत सुविधांची कमतरता, पाणी, वीज, रस्ते, वनअधिकार यांसारख्या विविध समस्या जाणून घेतल्या. आदिवासी बांधवांनी आपल्या अडचणींचे निवेदन प्राधिकरणाकडे सादर केले. समस्यांच्या तातडीने निराकरणासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

आर. एस. जगताप (प्रथम वर्ग न्यायाधीश व अध्यक्ष, यावल तालुका विधी सेवा समिती) यांनी उपस्थितांना कायदेविषयक मार्गदर्शन करून विविध न्यायलयीन योजनांची माहिती दिली.

अ‍ॅड. एस. जी. कवडीवाले (अध्यक्ष, यावल वकील संघ) यांनी वनअधिकार कायदा (FRA) याबाबत सविस्तर माहिती दिली. अ‍ॅड. अतुल भास्कर यांनी मूलभूत कायद्याविषयी जनजागृती केली.

ग्रामपंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे यांनी पंचायत समिति मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती समजावून सांगितली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समांतर विधी सहाय्यक शशिकांत वारूळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अ‍ॅड. याकूब तडवी यांनी मानले. कार्यक्रमाला पंचायत समितीचे विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, एपीआय अजयकुमार वाढवे, यावल वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. जी. कवडीवाले, आरएफओ बी. के. थोरात, राऊंड ऑफिसर विपुल पाटील, पत्रकार बंधू, प्राधिकरणाचे वरिष्ठ लिपिक प्रमोद ठाकरे, संतोष तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेले कार्यकर्ते
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारसिंग बारेला (अध्यक्ष JFM), दिला पाटील, हुकाऱ्या बारेला, जंगलू महाराज, डेब्या जिऱ्या, इदा पुट्ट्या, अशोक राठोड, संजीव तडवी (वरिष्ठ लिपिक), आकाश पाटील, राजू तडवी (बेलीफ), अविनाश पोफळे, राहुल चव्हाण, हेमंत फेगडे, अजय बढे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने