शहरातील कालिंका माता चौकाच्या पुढील भव्य होर्डिंग, इच्छा देवी चौक जवळ नमस्कार प्लाय शेजारील भव्य २ होर्डिंग यादेखील अनधिकृत*
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील स्वातंत्र्य चौक येथील सुप्रसिद्ध हॉटेल रूपाली बाहेरील अनधिकृत होर्डिंग प्रकरणी ॲड.पाटील यांनी तक्रार करून आरोप केल्यावर सदर प्रकरणी मनपातर्फे नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिसीप्रमाणे २४ तासाच्या आत ६०१८०/– दंड देखील भरण्यात आला.
शहरातील ते होर्डिंग देखील अनधिकृतच :
शहरातील कालिंका माता चौकाच्या पुढील भव्य होर्डिंग, इच्छा देवी चौक जवळ नमस्कार प्लाय शेजारील भव्य २ होर्डिंग यादेखील अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. याबाबत ॲड. पियुष पाटील यांनी जळगाव मनपाच्या अतिक्रमण विभागाच्याउपायुक्त यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार केली आहे.
याप्रकरणी मनपा तात्काळ नोटीस बजावून दंडाची आकारणी करून सदर अनधिकृत होर्डिंग काढण्याच्या तयारीत आहे.
सामान्यांवर गुन्हे धनदांडग्यांवर मनपा प्रशासन मेहरबान :
एकीकडे शहरातील छोटेखानी कार्यक्रमानिमित्त बॅनर व्यवसायिकांनी अनधिकृत रित्या बॅनर लावल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात आणि एकीकडे माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्यावर मनापा प्रशासन मेहरबान असून त्यांना अनेक संधी दिल्या जातात मात्र गुन्हा दाखल होत नाही. प्रशासनाने सर्वांना न्याय समान द्यावा हीच अपेक्षा.
– ॲड. पियुष नरेंद्र पाटील सर्वच भंगाळे च्या होर्डिंग अनधिकृत : ॲड. पियुष पाटील यांचा आरोपशहरातील कालिंका माता चौकाच्या पुढील भव्य होर्डिंग, इच्छा देवी चौक जवळ नमस्कार प्लाय शेजारील भव्य २ होर्डिंग यादेखील अनधिकृत*
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील स्वातंत्र्य चौक येथील सुप्रसिद्ध हॉटेल रूपाली बाहेरील अनधिकृत होर्डिंग प्रकरणी ॲड.पाटील यांनी तक्रार करून आरोप केल्यावर सदर प्रकरणी मनपातर्फे नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिसीप्रमाणे २४ तासाच्या आत ६०१८०/– दंड देखील भरण्यात आला.
शहरातील ते होर्डिंग देखील अनधिकृतच :
शहरातील कालिंका माता चौकाच्या पुढील भव्य होर्डिंग, इच्छा देवी चौक जवळ नमस्कार प्लाय शेजारील भव्य २ होर्डिंग यादेखील अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. याबाबत ॲड. पियुष पाटील यांनी जळगाव मनपाच्या अतिक्रमण विभागाच्याउपायुक्त यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार केली आहे.
याप्रकरणी मनपा तात्काळ नोटीस बजावून दंडाची आकारणी करून सदर अनधिकृत होर्डिंग काढण्याच्या तयारीत आहे.
सामान्यांवर गुन्हे धनदांडग्यांवर मनपा प्रशासन मेहरबान :
एकीकडे शहरातील छोटेखानी कार्यक्रमानिमित्त बॅनर व्यवसायिकांनी अनधिकृत रित्या बॅनर लावल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात आणि एकीकडे माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्यावर मनापा प्रशासन मेहरबान असून त्यांना अनेक संधी दिल्या जातात मात्र गुन्हा दाखल होत नाही. प्रशासनाने सर्वांना न्याय समान द्यावा हीच अपेक्षा.
– ॲड. पियुष नरेंद्र पाटील
टिप्पणी पोस्ट करा