Top News

जळगाव तालुका पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षकपदी शशिकांत पाटील यांची नियुक्ती

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात आदेश जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जारी केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी पद रिक्त होते. तालुका हद्दीत बोगस कॉल सेंटर प्रकरण उघडकीस आल्यानंतर, त्या वेळीचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांची ६ ऑक्टोबर रोजी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. त्यानंतर या ठिकाणी नवीन प्रभारी अधिकाऱ्याची नियुक्ती होणे अपेक्षित होते.

आता चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले शशिकांत पाटील यांची बदली जळगाव तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे तालुका पोलिस ठाण्याचे प्रशासकीय कामकाज आणि गुन्हे तपासाची गती पुन्हा वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्थानिक पातळीवर विविध गुन्हेगारी प्रकरणांच्या अनुषंगाने हे ठाणे नेहमीच चर्चेत राहिले आहे. त्यामुळे नव्याने आलेल्या प्रभारी अधिकारी पाटील यांच्यासमोर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने