Top News

कुसुंबा शिवारात गावठी कट्टा घेऊन दहशत माजवणारा इसम पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरालगतच्या कुसुंबा शिवारात गावठी कट्टा दाखवत नागरिकांना दहशत दाखवणाऱ्या एका इसमाला एमआयडीसी पोलिसांनी शिताफीने पकडत अटक केली. ही कारवाई ३० ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास करण्यात आली.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तात्काळ पथक रवाना केले. पो.उप.नि. राहुल तायडे, पो.उप.नि. चंद्रकांत धनके व अन्य सहकाऱ्यांनी दोस्ती पान सेंटरजवळ धाव घेतली. पोलिसांना पाहताच इसमाने पळ काढला, मात्र पाठलाग करून त्याला पकडण्यात आले.

सदर इसम अमोल सुरेश खैरनार (वय २८, रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव) असून, त्याच्या कमरेला गावठी कट्टा लावलेला आढळून आला. पंचासमक्ष कट्टा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे दहा हजार रुपये इतकी आहे.

या प्रकरणी पो.शि. राहुल घेटे यांच्या फिर्यादीवरून खैरनारविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३/२५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पो.हे.कॉ. रामदास कुंभार करीत असून, ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय अधिकारी नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने