जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्ह्यातील वंदना पाटील यांनी इतिहास विषयाच्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) मध्ये घवघवीत यश मिळवले आहे. या परीक्षेद्वारे प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी आवश्यक पात्रता निश्चित केली जाते.
वंदना पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पहिल्या पेपरमध्ये तब्बल ८४ गुण मिळवले, तर दुसऱ्या पेपरमध्ये त्यांनी १२८ गुणांची कमाई केली. या यशामुळे त्यांना प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता प्राप्त झाली असून त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
परीक्षेतील या उज्ज्वल यशाबद्दल वंदना पाटील यांचे नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मेहनत, चिकाटी आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर वंदना पाटील यांनी हे यश मिळवले असल्याचे सांगितले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा