Top News

लालबाग मंडळात ‘आदि योगी’चा देखावा, १५ फूट उंच गणेश मूर्ती ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I स्नेह फाउंडेशन संचलित लालबाग मित्र मंडळ आयोजित गणेशोत्सवाचा यंदा १७ वा वर्षाचा सोहळा साजरा होत असून, मंडळाच्या भव्य देखाव्याने उपनगरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सागर पार्क येथे उभारण्यात आलेल्या या देखाव्यात यावर्षी विशेष आकर्षण ठरले आहे *‘आदि योगी’*चा थक्क करणारा देखावा. तर मंडळाच्या गणेशाची १५ फूट उंचीची मूर्ती देखील सर्वांचे मन मोहून टाकणारी आहे.

जळगाव उपनगरातील सर्वात मोठे मंडळ अशी ओळख असलेल्या लालबाग मंडळाने आतापर्यंत अनेक देखावे सादर केले आहेत. यामध्ये केदारनाथ, लाल किल्ला, रुंदावण, अष्टविनायक यांचा समावेश असून, स्थानिक कलावंतांना वाव मिळावा यासाठी लोकनाट्याद्वारे प्रबोधनात्मक उपक्रमही राबविण्यात आले आहेत.

सामाजिक बांधिलकी जपत मंडळाने कोरोना व स्वाईन फ्ल्यू लसीकरण मोहिमा, रोग निदान शिबिरे, श्री स्वामी समर्थ देखावा, तसेच समस्त विश्वाला सुख-शांती लाभावी या हेतूने होमकुंड पूजन यांसारखे उपक्रम आयोजित केले आहेत. मंडळाने यापूर्वी राज्य शासनाच्या गणेशोत्सव स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावून विशेष यश मिळवले आहे.

फक्त उत्सवापुरतेच नव्हे, तर वर्षभर मंडळाकडून सामाजिक कार्य सुरू असते. यामध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, तसेच बालसुधारगृहातील मुलांसाठी विविध उपक्रम आयोजित करून समाजकार्याला चालना दिली जाते.

मंडळाची कार्यकारिणी
सद्यस्थितीत मंडळाचे अध्यक्ष तुषार खोंडे, उपाध्यक्ष कुंदन सोनवणे, सचिव यश म्हस्के, पदाधिकारी व सदस्य मंडळाचे कार्य पाहत आहेत. संस्थापक अध्यक्ष बंटी नेरपगारे व संस्थापक सचिव जयेश विसपुते असून, मार्गदर्शक मंडळात रोहित निकम, सपन झुनझुनवाला, शंकरराव पोळ, निखील चौधरी, विलास पाटील, रोमी महिंद्रा यांचा समावेश आहे.

लालबाग मित्र मंडळाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा उत्सव केवळ धार्मिक सोहळा न राहता सामाजिक संदेश देणारा आणि एकतेचे प्रतीक ठरत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने