४० मुले व ३२ मुलींचा सहभाग, १७-१७ संभाव्य खेळाडूंची निवड
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्हा १३ वर्षाआतील मुले व मुलींसाठी बास्केटबॉल जिल्हा संघ निवड चाचणी रविवारी (३१ ऑगस्ट) पाचोरा येथील एम.एम. महाविद्यालयाच्या बास्केटबॉल मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या निवड चाचणीचे उद्घाटन पाचोरा तालुका तहसीलदार विजय शिवाजी बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमासाठी एस.एस.एम.एम. महाविद्यालय पाचोरा व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था चेअरमन संजय वाघ, सहसचिव प्रा. वी.टी. जोशी, प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, क्रीडा संचालक प्रा. गिरीश पाटील तसेच विकास सूर्यवंशी (महाराष्ट्र पोलीस) यांचे सहकार्य लाभले.
जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून तब्बल ४० मुले व ३२ मुलींनी या निवड चाचणीत सहभाग नोंदवला. निवड समितीत लौकिक मुंदडा, जावेद शेख, वसीम शेख, जितेंद्र शिंदे, निलेश पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
निवड समितीने संभाव्य जिल्हा संघासाठी १७ मुले व १७ मुलींची निवड केली असून मुलांचा सराव शिबिर पाचोरा येथे तर मुलींचा शिबिर जळगाव येथे होणार आहे.
या संभाव्य संघाची घोषणा पाचोरा बास्केटबॉल ग्रुपचे आश्रयदाते दीपक पाटील (महाराष्ट्र पोलीस) यांच्या हस्ते करण्यात आली.
संभाव्य मुलींचा संघ
आराध्या कीर्तने, राज्यलक्ष्मी भोईटे, मोक्षदा सोनवणे, रोसी दास, तिथी जैन, आराध्या पाटील, शरण्या शिंदे, कल्याणी चौधरी, राजश्री चव्हाण, लक्ष्मी हटकर, खुषी अहिरराव, रिद्धी ठाकूर, श्रद्धा साखरे, श्रावणी पाटील, तेजस्वी बनसोडे, लक्ष्मी येवले, रिद्धी काळे.
संभाव्य मुलांचा संघ
यजुर्वेंद्र शिवदे, राज पाटील, गणेश पाटील, हर्ष जयस्वाल, संकेत मांडवे, उमर शेख, मंथन अहिरे, भाग्येश पाटील, विराज पाटील, अंश सपकाळ, लोकेश भोळे, रोहित पाटील, सत्यजित महाजन, मयुरेश चौधरी, सत्यम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, यजत गोमासे.
या निवड चाचणी यशस्वीतेसाठी दिनेश पाटील, सचिन भोसले, आशिष पाटील, भावेश पाटील, विजय बेंडाळे, मयूर लाहोरी तसेच पाचोरा ग्रुपच्या सदस्यांचे अनमोल सहकार्य लाभले.
आता निवडलेल्या संभाव्य १७-१७ खेळाडूंचे सराव शिबिर होऊन त्यातून अंतिम १२ मुले व १२ मुलींचा जिल्हा संघ निश्चित केला जाईल. हा अंतिम संघ महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेतर्फे आयोजित १३ वर्षांखालील आंतरजिल्हा राज्य अजिंक्यपद स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असून ही स्पर्धा १० ते १४ सप्टेंबर दरम्यान सोलापूर येथे पार पडणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा