Top News

बेकायदेशीर वाळू वाहतूक धडधडीत सुरू; आयशरला धडक देत डंपर बिनधास्त!


जामनेरमध्ये भरदिवसा अपघात; महसूल विभाग गप्प का?

जामनेर, निखिल वाणी I शहरातील मुख्य रस्त्यावर रविवारी भरदिवसा वाळू वाहतूक करणाऱ्या बेकायदेशीर डंपरने आयशर वाहनाला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हा अपघात जामनेर परिसरातील व्यस्त रस्त्यावर घडल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. विशेष म्हणजे, या घटनेनंतरही महसूल प्रशासन वा संबंधित विभागाने घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

जामनेर तालुक्यात दिवसाढवळ्या वाळूची वाहतूक सुरू असून महसूल विभाग मात्र गाढ झोपेत असल्याचे या अपघातातून पुन्हा अधोरेखित झाले आहे. दरम्यान, बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर कठोर कारवाईची मागणी नागरिक करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने