Top News

शालेय विद्यार्थ्यांसाठी बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षपूजन व चित्रकलेच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ आणि नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षपूजन सोहळा व भव्य बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास शालेय विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या उपक्रमाची सुरुवात वडाच्या झाडाचे पूजन करून करण्यात आली. उद्घाटन प्रा. राजेंद्र पाटील, सौ. मनीषा पाटील (अध्यक्ष), तसेच परीक्षक प्रा. सुनील दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्यानंतर पार पडलेल्या बालचित्रकला स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयक सुंदर, कल्पक चित्रांची निर्मिती केली.

या स्पर्धेत एकूण तीन गटांमध्ये एकूण ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक गटातून उत्कृष्ट चित्रांची निवड करून त्यांचे सन्मानपूर्वक पारितोषिक वितरण करण्यात आले. निकाल पुढीलप्रमाणे:

गट 1 (इयत्ता 1ली ते 3री):

प्रथम: निल देवेंद्र कोल्हे

द्वितीय: निशिता प्रदीप पाटील

तृतीय: डिंपल मनोज चौधरी

उत्तेजनार्थ: वरद येवले


गट 2 (इयत्ता 4थी ते 6वी):

प्रथम: आर्य विशाल जोशी

द्वितीय: श्रावणी मनोज बावस्कर

तृतीय: डिंपल राहुल राका

उत्तेजनार्थ: दिव्यश्री महेश बोरसे


गट 3 (इयत्ता 7वी ते 9वी):

प्रथम: श्रद्धा शेखर जैन

द्वितीय: कार्तिक तुषार मोरे

तृतीय: पार्शद अनिल अत्तरदे

उत्तेजनार्थ: आरती भिका पाटील


विशेष सन्मान – दिव्यांग विद्यार्थिनी:
तनिष्का हरीश परमार, दीपिका ज्ञानेश्वर पाटील, कल्याणी योगेश सोनवणे, हर्षाली अंकुश राठोड, रागिणी शांताराम भराडे

या विजेत्यांचा गौरव आमदार मा. राजुमामा भोळे, उद्योजक अजय बढे (विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन), डॉ. अमृता सोनवणे, डॉ. नितीन धांडे, चंद्रशेखर नेवे, डॉ. गणेश पाटील, राहुल चौधरी, पल्लवी सोनवणे आणि सौ. मनीषा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमास ऍड. सीमा जाधव, वंदना मंडावरे, आशा मौर्य, किमया पाटील, माधुरी शिंपी, शिल्पा बयास, हर्षा गुजराथी, नीता विसावे, रेणूका हिंगु, नूतन तासखेडकर, स्मिता पाटील, श्रावणी पाटील, नेहा जगताप, संगीता चौधरी, मोक्षदा चौधरी, हिमाली परमार, शोभना मकवाना, राखी दुट्टे यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव श्रीमती ज्योती राणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन किमया पाटील यांनी केले.

या उपक्रमातून चित्रकला स्पर्धेद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जनजागृती करण्यात आली. वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व बालमनात रुजवण्याचा सकारात्मक प्रयत्न यावेळी यशस्वीपणे पार पडला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने