जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील इलेक्ट्रिक पोल झुकलेल्या अवस्थेत
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील आकाशवाणी चौकात आज सायंकाळी विद्युत खांब वाकल्यामुळे काही काळासाठी वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला. मिळालेल्या माहितीनुसार, काल झालेला वादळी वारा मोठ्या प्रमाणात सुरू होता, तसेच जळगाव जिल्ह्याच्या काही भागात व जळगाव शहरात पावसाने थैमान घालून रस्त्यावरील इलेक्ट्रिक पोल झुकलेला असून, तसेच मोठमोठे झाड, व पिकांचे नुकसान ही झालेले दिसून येत होते. तसेच विद्युत वाहिन्याही ताणलेल्या अवस्थेत दिसत आहेत.
घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी, पोलीस अधिकारी व स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. ट्रॅक्टर व क्रेनच्या सहाय्याने खांबाला आधार देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र तिथून जाणाऱ्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
या ठिकाणी मुख्य रस्ते व स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर या मार्गावर असतात. वेळेवर हस्तक्षेप झाल्यामुळे अपघाताची शक्यता टळली. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग सुचवण्यात आले असून, नागरिकांनी काळजीपूर्वक प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा