Top News

१८वी स्पीड स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार पडली – शेकडो खेळाडूंनी घेतला सहभाग


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I दरवर्षीप्रमाणे यंदाही १८वी स्पीड स्केटिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि स्पर्धात्मक वातावरणात रविवारी, दिनांक ४ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता मेजर स्पोर्ट्स क्लब येथे पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन पारंपरिक पद्धतीने सरस्वती मातेच्या प्रतिमेला फुलांचा हार अर्पण करून व नारळ फोडून करण्यात आले.

या स्पर्धांमध्ये बिगिनर, क्वाड़ व इनलाईन अशा विविध स्केटिंग प्रकारांचा समावेश होता आणि त्या मुला व मुलींच्या विभागात घेण्यात आल्या. स्पर्धा ४ वर्षे, ६ वर्षे, ८ वर्षे, १० वर्षे, १२ वर्षे, १४ वर्षे आणि खुला गट अशा वेगवेगळ्या वयोगटांमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या.


स्पर्धेतील प्रमुख विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे:

४ वर्षे वयोगट: मुले: रेयांश मंधान – प्रथम 

६ वर्षे वयोगट - मुले: विहान मोरे – प्रथम, श्लोक काटकर – द्वितीय, राघव पटेल – तृतीय

क्वाड़ स्केट: स्वराज देशमुख – प्रथम, स्मित तायडे – द्वितीय

मुली: ओजस्वी पाटील – प्रथम

इनलाईन मुले: विक्रांत संघवी – प्रथम


८ वर्षे वयोगट : मुले: ऋषभ मोरे – प्रथम, गीत पारप्यानी – द्वितीय

क्वाड़ स्केट: निरव दुसाने – प्रथम, आदित्य सपकाळे – द्वितीय, राजवीर केसवानी – तृतीय

 मुली: आरोही दांडगे – प्रथम, सानवी देशमुख – द्वितीय

इनलाईन: निव लोढा – प्रथम, गर्विन पंजाबी – द्वितीय


१० वर्षे वयोगट:

मुले: प्रणवी देसले – प्रथम

मुली: ओवी देशमुख – द्वितीय, मनस्वी चौधरी – तृतीय

इनलाईन मुले: अनमोल रंगलानी – प्रथम, अथर्व दुतोंडे – द्वितीय

मुली: यशस्वी पुरोहित – प्रथम, सिया वलभानी – द्वितीय

क्वाड़: अनिकेत कुलकर्णी – प्रथम, कृष्णा शर्मा – द्वितीय, सुशांत पाटील – तृतीय

मुले (अतिरिक्त): आरुष जाधव – प्रथम, बुरानुद्दीन इजि – द्वितीय, चिन्मय सोमवंशी – तृतीय


१२ वर्षे वयोगट:

मुले: सर्व शेरीकर – प्रथम, प्रणव जांगिड – द्वितीय, लक्ष नेमाडे – तृतीय

मुली: लावण्या भारी – प्रथम, आराध्य सोनवल – द्वितीय

इनलाईन: हिमांशू खंबायत – प्रथम, इभ्य चौधरी – द्वितीय, नंदकिशोर पारप्यानी – तृतीय


१४ वर्षे वयोगट: 

* मुली: इशिता सपकाळे – प्रथम, दिशिता बजाज – द्वितीय

* मुले: विनायक आहुजा – प्रथम, यश मोरे – द्वितीय, क्षितिज पिल्ले – तृतीय

* इनलाईन: नैतिक तोतला – प्रथम


१६ वर्षे वयोगट (खुला गट):

* मुले: श्लोक कुमावत – प्रथम, ऋषभ मोरे – द्वितीय, मिथिल चौधरी – प्रथम

या सर्व विजेत्या स्पर्धकांना *पदक* आणि *प्रशस्तीपत्र* देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा *उत्कृष्ट शिस्तबद्धतेने* पार पाडण्यात आली.

पंच म्हणून - विशाल मोरे, प्रितम मोरे, प्रणव चौधरी, दीपक आखाडे, सपना पवार, अनंत सोनवणे यांनी जबाबदारी सांभाळली. तर स्पर्धा यशस्वीतेसाठी आदित्य भालेराव, पूर्वा महाशब्दे, अनुष्का पाटील, विधी लोढया, रिया खैरनार, अद्विका सिंग, विशाखा अटाळे, गौरी पिंगळे यांनी मोलाचे सहकार्य केले. या स्पर्धेमुळे लहान वयोगटांतील स्केटर्सना प्रोत्साहन मिळाले असून, त्यांच्यातील आत्मविश्वासात मोठी भर पडल्याचे पालकांनी सांगितले.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने