Top News

जळगावात मोकळ्या मैदानावर आढळली बेवारस रेती; प्रशासनाचे दुर्लक्ष


अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह 

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील रामानंद नगर परिसरात एका मोकळ्या मैदानावर तब्बल ७१ ब्रास रेती बेवारस अवस्थेत आढळून आली आहे. ही रेती कोणाच्या मालकीची आहे आणि ती कशी जमा झाली याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसून, विशेष म्हणजे स्थानिक प्रशासनाने अद्याप या प्रकाराची कोणतीही दखल घेतलेली नाही.

ही रेती बेकायदेशीर मार्गाने साठवण्यात आल्याचा संशय व्यक्त होत असून, परिसरातील नागरिकांमध्ये यामुळे चिंता आणि संतापाचे वातावरण आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, हे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

अवैध रेती उपसा व साठवणूक यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळण्याची शक्यता असून, प्रशासनाने तातडीने कारवाई करून संबंधित दोषींवर कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

प्रशासनाकडून कोणतीही कारवाई नाही
“जळगाव शहरातील मोकळ्या मैदानावर आढळलेल्या रेतीच्या साठ्यावर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तहसीलदार शितल राजपूत यांना माहिती दिल्यानंतरही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांत नाराजी आहे.”

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने