जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जळगाव शहरात एक प्रेरणादायी आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत आणि पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलत, आज दिनांक २४ मे रोजी शहरात विविध प्रकारच्या स्थानिक वृक्षांची लागवड करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत श्रमदानातून वृक्षारोपणाची संकल्पना राबवत एकूण ३३ झाडे लावण्यात आली. यात आंबा, चिंच, सिताफळ, करंज, कदंब, इंग्रजी चिंच, फापडा अशा पर्यावरणासाठी उपयुक्त व स्थानिक प्रजातींचा समावेश करण्यात आला. हे झाडे परिसराच्या हरित पट्ट्यासाठी तसेच पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.
मा. अमित ठाकरे यांचे पर्यावरणाप्रती असलेले भान आणि संवेदनशीलता लक्षात घेता, त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. "वाढदिवस साजरा करण्याची नवी दिशा आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प" हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता.
या वृक्षारोपण कार्यक्रमास मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उपमहानगराध्यक्ष ललित शर्मा, श्रीकृष्ण मेंगडे, सतीश सैंदाणे, चेतन पवार, जनहित जिल्हा संघटक राजेंद्र निकम, साजन पाटील, प्रकाश जोशी, राहुल चव्हाण, संदीप मांडोळे तसेच विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांनी उपस्थित राहून आपला सक्रिय सहभाग नोंदवला.
या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार असून, सामाजिकदृष्ट्या जबाबदार आणि सकारात्मक संदेश देण्यात मनसे यशस्वी ठरली आहे.
टिप्पणी पोस्ट करा