Top News

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त तांबापुरात ३०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

कविरा ग्रुपकडून मोफत लायब्ररीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव; समाज उभारणीकडे ठोस पावले

द इंडिया रिपोर्ट न्यूज, निखिल वाणी I 
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त कविरा ग्रुपतर्फे एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. तांबापूर येथे गरजू आणि होतकरू अशा तब्बल ३०० विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकं आणि वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संतोष पाटील (शिवसेना महानगरप्रमुख) यांच्या हस्ते या शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी कविरा ग्रुपच्या मोफत लायब्ररीमध्ये शिक्षण घेत विविध सरकारी विभागांमध्ये निवड झालेल्या २० यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातून येऊन यशाचे शिखर गाठले असल्याने त्यांचे कौतुक करत उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला.

कविरा ग्रुपचे अध्यक्ष अॅड. सचिन हटकर यांनी यावेळी सांगितले की, “धनगर समाजातील विद्यार्थ्यांना योग्य शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी मोफत लायब्ररी, सामूहिक विवाह सोहळे व इतर सामाजिक उपक्रम राबवले जात असतात. समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

कार्यक्रमास विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. यामध्ये शिवाजी कोपनर, दीपक काळनोर, विनोद शिंदे, जिभाउ कोपनर, अशोक कोपनर, नाना पिसे, राहुल माने, दादाभाई सुरंगे, गोपाल लकडे, जितू चोरमले, आकाश मासाळ, नाना हटकर, विशाल सरक, मुकेश हटकर, ऋषी काळनोर, प्रवीण चोरमले, विनोद हटकर, सागर चोरमले, सोपान हटकर, तुषार पाटील, अॅड. योगेश पाटील, अॅड. दीपक वाघ, अॅड. अजय पाटील, श्रीकांत पाटील यांचा समावेश होता. तसेच कविरा ग्रुपमधील विद्यार्थ्यांचेही विशेष सहकार्य लाभले.

या कार्यक्रमातून कविरा ग्रुपने शिक्षण, सामाजिक उत्तरदायित्व व सामूहिक प्रयत्नांची एक आदर्श पद्धत समाजापुढे ठेवली आहे. राजमाता अहिल्यादेवींच्या कार्याला समर्पित हा उपक्रम खर्‍या अर्थाने समाजाच्या प्रगतीचा मार्गदर्शक ठरत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने