Top News

जळगावात तरूणीवर अत्याचार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शारीरिक संबंधांचा आरोप

एमआयडीसी पोलिसांत आरोपीविरोधात गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरू

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I एरंडोल येथील एका २३ वर्षीय तरूणीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना जळगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये घडली असून, याप्रकरणी संशयित आरोपीविरोधात सोमवारी २६ मे रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरूणी जामनेर तालुक्याची रहिवाशी असून सध्या एरंडोलमध्ये वास्तव्य करत आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये तिची ओळख बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बरेजवळा येथील विश्वजीत विठ्ठलसिंग सिसोदे (वय २७) याच्याशी झाली होती. ओळखीचा फायदा घेत सिसोदे याने लग्नाचे आमिष दाखवून तरूणीला जळगावमधील एका हॉटेलमध्ये नेले आणि तिच्यावर जबरदस्ती केली.

त्यानंतर सिसोदे याने पीडित तरुणीसोबतचे काही खासगी व्हिडीओ आणि चॅटिंग तिच्या आई-वडिलांना दाखवण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, तिच्या वडिलांना व्हॉटसॲपवरून जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या.

अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून पीडित तरूणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार आरोपी विश्वजीत विठ्ठलसिंग सिसोदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे हे करीत आहेत.

(टीप: सदर घटना अत्यंत गंभीर असून पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्यात आलेली आहे.)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने