Top News

राज्य पोलीस दलात मोठे बदल: २४९ निरीक्षकांच्या बदल्या, अनेकांना पदोन्नती

जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे मानगावकर मुंबईला बदली, सागर शिंपी नवे निरीक्षक

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I महाराष्ट्र राज्य पोलीस दलात प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया गतिमान झाली असून, मंगळवारी राज्य शासनाने २४९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जाहीर केले. यामध्ये काही अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली आहे, तर काही बदल्यांवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

या यादीत जळगाव जिल्ह्यातीलही काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांची बदली मुंबई शहर विभागात झाली आहे. तर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे निरीक्षक सागर शिंपी यांची नियुक्ती जळगाव येथे करण्यात आली आहे.

दरम्यान, भडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग विठ्ठल पवार यांची पदोन्नती प्रस्तावित असल्याने त्यांच्या बदल्येस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

या प्रशासकीय फेरबदलांमुळे राज्य पोलीस दलात अंतर्गत हालचालींना वेग आला असून, एकूण २१५ निरीक्षकांना वरिष्ठ पदांवर पदोन्नती मिळणार आहे. त्यामुळे नव्या जबाबदाऱ्यांसह पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांची भूमिका आणखी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने