Top News

जळगावातील सेंट टेरेसा कनिष्ठ महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल जाहीर

 
यंदाही मुलींनी मारली बाजी

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील शिरसोली रोड, नेहरू नगर येथील सेंट टेरेसा इंग्लिश मिडीयम कनिष्ठ महाविद्यालयाचा १२ वी चा नुकतीच निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये महाविद्यालयातील यावर्षीही १०० टक्के निकाल जाहीर झाला. 

यंदाही आज १२ वी चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सेंट टेरेसा कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या परीक्षेत अपूर्व यश संपादन करत संपूर्ण महाविद्याल याचा गौरव वाढविला आहे. विज्ञान आणि वाणिज्य या दोन्ही शाखांमध्ये १००% निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ कामगिरीने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

विज्ञान शाखेचा निकाल - कॉलेजच्या विज्ञान शाखेतील यंदाच्या निकालात तीन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावत त्यांच्या मेहनतीला यश मिळवलं आहे. प्रथम: रेश्मा प्रदीप मोरे – ८७.८३%, द्वितीय : भूमिका दिलीप पाटील – ८५.६७%, तृतीय: गार्गी प्रविण जाधव – ८५.१७%. या शाखेत एकूण २५ विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन, तर २ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे.

तसेच वाणिज्य शाखेचा निकाल - वाणिज्य शाखेत विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश संपादन करत महाविद्यालयाचे नाव उज्वल केले. प्रथम: प्राची जितेंद्र तेजवानी – ९६.८३%, द्वितीय: निकिता संजय लखानी – ९५%, तृतीय: सानिया मुकेशकुमार थारवानी – ९३.१७%. या विभागात ९ विद्यार्थी मेरिट यादीत, २८ विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन, आणि १ विद्यार्थ्याला प्रथम श्रेणी मिळाली आहे. विशेष म्हणजे प्राची तेजवानी हिने अकौंटन्सी या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून गौरव प्राप्त केला आहे. या उज्वल निकालामागे टेरेशियन संस्थेतील सर्व आदरणीय सिस्टर्स, शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे मोठे योगदान मिळालेले आहे. त्यांना मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने