बौद्ध वंदना, शपथ विधी, खीर व शैक्षणिक साहित्य वाटपाने कार्यक्रमाची सांगता
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I तांबापुरा मच्छीबाजार येथे अभेद्या फाऊंडेशन शिक्षणघर यांच्या वतीने वैशाखी पौर्णिमा अर्थात भगवान बुद्ध जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणघरातील बालगटाने सादर केलेल्या मंगल बौद्ध वंदनेने झाली. या निमित्ताने उपस्थितांनी एकता, बंधुता व समानतेच्या मूल्यांसाठी कार्यरत राहण्याची शपथ घेतली.
शपथविधीमध्ये, "आपण येथून पुढे कुठल्याही प्रकारचा ध्वनीप्रदूषण करणार नाही, वाहतुकीस अडथळा होईल असे वर्तन टाळू, सर्व भारतीयांना आपले बंधू आणि भगिनी मानून देशात एकता, बंधुता आणि समानता प्रस्थापित करू," अशी प्रतिज्ञा सर्वांनी घेतली. कार्यक्रमाची सांगता खीर वाटप आणि गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वितरित करून करण्यात आली.
या कार्यक्रमाला स्थानिक मुले व घरेलू कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष वैशाली झाल्टे चौधरी, अॅड. राजेश झाल्टे आणि प्रितेश अनिल चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
टिप्पणी पोस्ट करा